Shree Yatra
प्रस्तावना

श्रीनिवास पाटील हे कराडचे खासदार म्हणून सर्वांना परिचित असणारे व्यक्तिमत्व ! परंतु खासदारकी पलिकडेही एक उत्तम विद्यार्थी, एक लोकाभिमुख प्रशासक, एक कला आणि साहित्य रसिक, एक उत्तम वक्ते, अध्यात्म आणि आधुनिक विचारांची सांगड घालणारे , अजातशत्रू व्यक्तिमत्व अशा अनेक पैलूंचा संगम म्हणजे श्रीनिवास पाटील.

एका छोट्या गावात व सामान्य कुटुंबात जीवनाची सुरुवात करूनही स्वकर्तृत्व, प्रतिभा, अभ्यास व सचोटीच्या बळावर आपल्या शैक्षणिक , प्रशासकीय व राजकीय कारकिर्दीत साहेबांनी गाठलेली उंची हि अनेकांसाठी स्फूर्तीदायी आहे .